एका सकाळची गोष्ट ###############

📅 2014-01-16 :tags: marathi, personal :slug: one-fine-morning :category: marathi

काल रात्री झोप कशी ती आलीच नाही, रात्र भर असं‌ जागरण झाल्यामुळे, आज सकाळी मी थोडा रडतच उठलो. पहीले पायावरचं पांघरूण बाजूला केले लाथा मार मारून, बाबा बाजूलाच होते, त्यामुळे मग थोडा थांबलो, काय करावं अशा विचारात होतो, बाजूला माझा आवडता लोड होता, तो घ्यावा असं वाटलं, म्हणून डाव्या कुशीवर वळलो, थोडं अडखळल्या सारखं झालं, मला परत रडू येणार असं वाटायला लागलं, अजून थोडा प्र्यत्न केला, उजवा पाय जोरात लोडाच्या दिशेने टाकला. 

आता बाबा अचानक ओरडू लागले, आईला बोलावू लागले, थोडा वेळ मी काय झालयं, असा विचार केला, मला काही कळेना, असू द्या, काही का असेना. एवढ्यात आजी, आजोबा, आणी आई आले, साधारण पणे, आता आई मला जवळ घेते, पण तिने चक्क mobile phone उचलला . . असो. 

आता पर्यंत मी पोटावर पालथा पडलो होतो, पण डावा हात पोटाखालीच अडकला होता, आता तोन्डातून लाळ गळायला लागली होती, पण हात काही निघेना, मग दोनही पाय पोटाखाली घेतले, मग पोट थोडं उचललं गेलं आणी हात सुटला . . . हुश्श . . 

इतका वेळ लांब उभी राहिलेली आई आता जवळ आली, आईच्या डोळ्यात पाणी होतं, तिने मला उचलून घेतले, आणि म्हणाली, “सोना, आज तू मोठ्ठी प्र् गती केलीस, I am so proud of you” मला काही कळलं नाही एवढं काय झालं ते, मला तर लोड घ्यायचा होता, तो तर नाहीच मिळाला, पण पोटावर पडलो ह्याचा ह्यांना एवढा कसला आनंद झालाय ?

नंतर दिवसभर परत प्र् यत्न करून सुद्धा तसं काही जमलं नाहीच, हे लोक उगीच वाट बघत होते.